गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या आणखी आठ गाड्या जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपती उत्सव 2022 साठी मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मंगळुरु जंक्शन दरम्यान अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे. मध्य रेल्वेने यापूर्वीच 198 गणपती विशेष चालवण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे यावर्षी एकूण गणपती विशेषची संख्या 206 होणार आहे.  तपशील खालीलप्रमाणे आहेत:-

01165 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. 16.8.2022 ते 6.9.2022 (4 सेवा) पर्यंत दर मंगळवारी 00.45 वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन येथे त्याच दिवशी 19.30 वाजता पोहोचेल.

01166 विशेष दि. 16.8.2022 ते 6.9.2022 (4 सेवा) पर्यंत दर मंगळवारी मंगळुरु जंक्शन येथून 22.20 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 18.30 वाजता पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कानकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, होन्नावर, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बैन्दूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल, ठोकूर

संरचना: एक प्रथम वातानुकूलित, 3 द्वितीय वातानुकूलित, 15 तृतीय वातानुकूलित, दोन जनरेटर व्हॅन, एक पँट्री कार.

आरक्षण: विशेष गाडी क्र. 01165 चे विशेष शुल्कासह बुकिंग दि. 18.7.2022 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.