सामना ऑनलाईन । मुंबई
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक लोकल गाड्यांचा खोळंबा झाला आहे. माटुंगा स्थानकाजवळ स्लो ट्रॅकवर बिघाड झाल्याने गाड्यांचा खोळंबा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. लोकलच्या खोळंब्यामुळे दादर-परळजवळ अनेक गाड्या थांबल्या आहेत. याचा फटका प्रवाशांना बसला असून काहींनी लोकल ट्रॅकवर चालत जात पुढचे स्टेशन गाठले.
























































