दिवाळीत मध्य रेल्वेच्या 944 विशेष गाड्या धावणार

दिवाळीत मध्य रेल्वेच्या 944 विशेष गाड्या धावणार आहेत. त्यात आरक्षित आणि अनारक्षित गाड्यांचा समावेश असेल. दक्षिण आणि उत्तर हिंदुस्थानला जाणाऱ्या या लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे कोल्हापूर, सावंतवाडीला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. यंदा 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे, तर 22 ऑक्टोबरपासून छट पूजेला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने 944 विशेष गाड्यांचे नियोजन सुरू केले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागातून कोल्हापूर, सावंतवाडीबरोबरच दक्षिण व उत्तर हिंदुस्थानातील विविध शहरांमध्ये विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यात वातानुकूलित, शयनयानासह अनारक्षित मिश्र व्यवस्था असलेल्या गाड्यांचा समावेश असेल.