
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता आणि मतदानाला काही तास शिल्लक असताना केंद्र सरकारने दहिसर येथील हायफ्रिक्वेन्सी रडारचे गोराई येथे स्थलांतर करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत रडारच्या या स्थलांतराला हिरवा कंदील दाखवून पश्चिम उपनगरातील मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांवर डोळा ठेवत दहिसर येथील हायफ्रिक्वेन्सी रडारचे गोराई येथे स्थलांतर करण्यास राज्य सरकारने यापूर्वी मंजुरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आता महापालिका निवडणुका लक्षात घेऊन केंद्र सरकारने तातडीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
पोस्टमध्ये काय म्हटले आहे
दहिसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे विमानतळासाठीचे हायफ्रिक्वेन्सी रडार गोराई येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने घेतला असून त्याला केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री महोदयांनीसुद्धा मंजुरी प्रदान केली आहे. यासाठी गोराई येथे जमीन देण्याचा निर्णय राज्य सरकारने आधीच घेतला होता. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नितांत आभारी आहोत. यामुळे या परिसरातील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.





























































