
ठाणे आणि मुलुंडदरम्यान नव्या उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या उभारणीला केंद्र सरकारकडून तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे. वाढती लोकसंख्या, उपनगरांचा विस्तार आणि वाढलेला प्रवासी ताण लक्षात घेता या दोन स्थानकांदरम्यान नव्या रेल्वे स्थानकाची उभारणी करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या स्थानकामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.

























































