सीईटी परीक्षा सर्व्हर बिघाड, 252 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या सीईटी परीक्षेत तांत्रिक गोंधळ झाला आहे. शुक्रवारी सकाळी याचा फटका बोरिवलीतील तब्बल 252 विद्यार्थ्यांना बसला. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता पुन्हा होणार असून येत्या 15 किंवा 16 मे रोजी परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे.

अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, पृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या आणि विद्यार्थी संख्या अधिक असलेली एमएचटी सीईटी परीक्षेतील पीसीएम ग्रुपची परीक्षा सुरू आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात परीक्षा देण्यासाठी  बोरिवली येथील एल एन महाविद्यालयातील परीक्षा पेंद्रावर विद्यार्थी पोहोचले. मात्र या परीक्षेसाठी तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा सुरुच झाली नाही. ही परीक्षा 17 मे पर्यंत राज्यभरातील  विविध सत्रात होत आहे.