भाजपच्या माजी आमदाराच्या पत्नीवर बनावट नोटा वापरल्याचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चाईबासामध्ये भाजपच्या माजी आमदाराच्या पत्नीवर बाजारात दोन हजार रूपयाच्या बनावट नोटा व्यवहारात वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. केवळ हेच नाही तर बनावट नोटा वाटल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आल्यावर तिने चाकू हल्ला केल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. आता हे प्रकरण चाईबासाच्या मुफ्फसिल ठाण्यात पोहोचले आहे.

ज्या महिलेवर वर बनावट नोटा वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे ती महिला चाईबासाच्या भाजपच्या माजी आमदार पुतकर हेम्ब्रमची दुसरी पत्नी मलया हेम्ब्रम आहे. लोकांचे म्हणणे आहे की, मलया हेम्ब्रम वेगवेगळ्या दुकानांमधून खरेदी करत होती. खरेदी केल्यानंतर दोन हजाराच्या नकली नोटो देत होती. दुकानदारांकडून या नोटा बँकेत जमा करताना खोट्या असल्याचे उघड झाले. अशा दुकानदारांनी या नोटा मलयाकडून आल्याचे सांगितले. आजतक या वृत्तवाहिनीच्या संकेत स्थळावर हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

कापड विक्रेत्यापासून मासे विकणाऱ्या दुकानदारांपर्यंत तिने बनावट नोटा देऊन व्यवहार केले होते. मलाया पुन्हा या पैकी काही दुकानांमध्ये गेल्यावर तिला त्या नोटा परत करण्यात आल्या. मात्र त्यावेळी तिने त्या नोटा आपण दिल्याचे कबुल केले नाही. त्यामुळे वाद सुरू झाला.

चर्चेनंतर या दोन्ही पक्षांमध्ये वादावादी झाली. एक दुकानादर गंभीर जखमी झाला. तसेच महिलाही जखमी आहे. यासर्व प्रकरणी महिलेची चौकशी सुरू झाली आहे. दुकानदारांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे पोलिसांना बनावट नोटांसदर्भातील आणखी काही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. पोलीस लवकरच या प्रकरणाचा छडा लावणार आहेत.