उदगीर येथे मोटारसायकल स्वारांनी गंठण पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

उदगीर शहरातील बिदर नाक्याकडे पायी चालत जाणाऱ्या शिक्षिकेचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या दोघा युवकांनी पळवल्याची घटना घडली. ५७ हजार रुपयांच्या गंठणच्या चोरी प्रकरणी अज्ञात युवकांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात या प्रकरणी श्रध्दा शंकरराव नागनगिरे (सहशिक्षीका वडमुरंबी, ता.देवणी) रा. रुद्रा टॉवर, कल्पना चौक, उदगीर यांनी तक्रार दाखल केली. त्या पायी शाळेत जात असताना बिदर नाक्याजवळ मोटारसायकलवरुन दोघे युवक आले. त्यांनी त्यांच्या गळयातील मिनी गंठण १८ ग्रॅमचे (किंमत ५७ हजार रुपये) हिसका देऊन पळवले. काळया रंगाची लाल पट्टा असलेल्या पल्सर मोटारसायकलवरून ते आले होते. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात दोघा मोटारसायकल स्वारांवर गुन्हा दाखल केला आहे.