का दिला FTIIच्या अध्यक्षपदाचा अनुपम खेर यांनी राजीनामा? वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

अभिनेते अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. एका ट्विटद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी राज्यवर्धन सिंह माहिती आणि प्रसारण मंत्री राठोड यांना लिहलेल्या पत्राचा फोटोही दाखवला आहे. या फोटोमध्ये त्यांनी राजीनामा देण्यामागचं कारण दिलं आहे.

अनुपम खेर यांनी लिहलेल्या पत्रात म्हटलंय की “हे पद स्वीकारण्यापूर्वी तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना त्यांनी कल्पना दिली होती की अमेरिकेतील एका मालिकेसाठी त्यांना करारबद्ध करण्यात आलं असून त्यांना चित्रीकरणासाठी दीर्घकाळ अमेरिकेत रहावं लागू शकतं. याच चित्रीकरणासाठी अनुपम खेर हे जवळपास ९ महिने अमेरिकेत असून त्यांना आणकी चार महिने तिथेच रहावं लागणार आहे. जे पद त्यांना देण्यात आलेलं आहे, त्या पदावरील व्यक्ती दीर्घकाळासाठी देशाबाहेर असणं, आणि संस्थेसाठी वेळ देता न येणं हे या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी, व्यवस्थापनासाठी योग्य ठरणार नाही” याच कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचं खेर यांनी म्हटलंय.