प्राजक्ता कराड, प्रियांका रोडे, राजश्री देशमुख, अनिल अष्टेकर, संजय फड यांच्या गळ्यात सभापतींची माळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

परळी वैजनाथ नगर परिषदेच्या सभागृहात नवीन वर्षासाठी सभापती निवडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बांधकाम सभापती प्रियांका रोडे, पाणी पुरवठा सभापती प्राजक्ता भावड्या कराड यांची फेर निवड करण्यात आली.

आरोग्य व स्वच्छता सभापती अनिल अष्टेकर, शिक्षण सभापती संजय फड तर महिला व बालकल्याण सभापती राजश्री देशमुख तर उपसभापती कमलबाई कुकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीची प्रक्रीया पार पाडण्यासाठी तहासिलदार शरद झाडके यांनी काम पाहिले तर साहाय्यक म्हणून न. प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे होत्या. यावेळी नगराध्यक्षा सरोजनी हालगे, उपनगराध्यक्ष आयुबभाई पठाण व गटनेते वाल्मिक आण्णा कराड उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ह्या निवडी पार पाडल्या गेल्या.