चाकूर येथे घर फोडले 4 लाख 54 हजारांचा मुद्देमाल लंपास

चाकूर येथील तहसिल कार्यालयाजवळील शासकीय निवासातील कर्मचाऱ्यांचे घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून त्यात 4 लाख 54 हजार रूपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे.

याबाबत या घटनेची तलाठी मुक्ता सुधाकर भुरकापल्ले यांनी पोलीसात फिर्याद दिली असून मी येथील तहसीलच्या शासकीय निवासात राहत असून शनिवारी आई -वडील यांच्याकडे येणगेवाडी ता.चाकूर येथे गेले होते .घरातील कपाटाला लाँक करुन गेले असता दरम्यान रविवारी सकाळी माझे पती रविंद्र वंगाटे यांनी मला फोन करून घरी चोरी झाल्याचे कळविल्याने मी घरी आले .तेव्हा माझ्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाट फोडून पर्समधील ठेवलेले पाच तोळे सोन्याच्या पाटल्या ,चार तोळे गळ्यातील पट्टी गंठन ,दीड तोळ्याच्या वेगवेगळ्या चार अंगठ्या ,दीड तोळ्याचे मिनी गंठन ,पाच ग्रामचे कानातील फुले,लहान मुलाचे दोन तोळ्याचे चांदीचे कडे,चांदीचे वाळे आणि महसुल कर वसुलीचे 25 हजार रोख रक्कम असे एकूण 4 लाख 54 हजार रूपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे नमुद करण्यात आले आहे .याबाबत पोलीस या घटनेचा तपास करत असून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक कपील पाटील हे तपास करीत आहेत .