लातूर – चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन

2600

लातूर येथील पारिजात मंगल कार्यालयात सोमवार 23 सप्टेंबर रोजी शिवसेना, युवासेना, शिवसेना महिला आघाडी, व्यापारी आघाडी, शिक्षक सेना, कामगार सेना, विद्यार्थी वाहतूक सेना, विधी सेना, अ‍ॅटोरिक्षा चालक सेना आणि इतर संलग्न संघटनांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख संजय मोरे, शहर विधानसभा संपर्कप्रमुख संजय पाचंगे, माजी आमदार दिनकर माने यांच्यायसह इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक श्रीपाद कुलकर्णी, कामगार सेनेचे राज्य चिटणीस शिवाजी माने यांनी दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभुमिवर पारिजात मंगल कार्यालयात सोमवार 23 रोजी सकाळी 11 वाजता हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आयोजीत करण्यात आलेल्या या स्नेह मेळाव्यास शिवसैनिक, युवासैनिक यांनी उपस्थित रहावे असे अवाहन मेळाव्याचे आयोजक श्रीपाद कुलकर्णी, शिवाजी माने यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या