सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी, मुंबई या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत बाजीराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी सुधाकर जगदाळे, तर मानद सचिवपदी किशोर पाटील यांची निवड झाली आहे. याशिवाय सतीश मानेसर (सहसचिव) आणि सतेश शिंदे (खजिनदार) यांचीदेखील निवड करण्यात आली आहे. या सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे. याप्रसंगी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याकरिता संस्थेचे ज्येष्ठ माजी संचालक गणपत खरात, 166 अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे पर्यवेक्षक राजेश खरात तसेच शाहीर मधुकर रुपवते यांनी सदिच्छा भेट घेतली.