पुणेकर मला परका समजणार नाहीत – चंद्रकांत पाटील

chandrakant-patil

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला पुण्यात ब्राह्मण महासंघ तसेच कोथरूडकरांनी कडाडून विरोध केला आहे. आम्हाला घरचाच उमेदवार हवा अशी त्यांची मागणी आहे. याबाबत पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता, पुणेकर मला परका समजणार नाहीत. कोथरूड मला जितके माहीत आहे तितके कुणालाच माहीत नाही, असे उत्तर पाटील यांनी दिले.

चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचा विरोध

आमदार अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये आले होते तेव्हा पत्रकारांनी त्यांना घेराव घातला. पाटील पुढे म्हणाले, 1982 पासून मी विद्यार्थी परिषदेचा संघटनमंत्री असताना पुण्याला अनेकदा गेलो असून सातत्याने जात असतो. त्यामुळे पुणेकरांसाठी मी काही परका नाही. पुणे शहर, कोथरूडमधील गल्ल्यागल्ल्यांमध्ये वर्षानुवर्षे माझी ओळख असणारे असे अनेकजण आहेत. मी अनेकदा त्यांच्या घरीही गेलोय. केंद्रीय नेतृत्वाच्या मनात पक्षातील काही गणिते असतील. म्हणूनच त्यांनी मला कोथरूडमधून निवडणुक लढवण्याचा आदेश दिलाय, असेही पाटील म्हणाले.

बंडखोरही माघार घेतील

कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला असून लोकसभा निवडणुकीत येथे भाजपला दीड लाखाहून अधिक मते मिळाली होती. त्यातही कुणी बंडखोरी केली, उमेदवारी अर्ज भरलाच, रागावले, नाराज झालेच तर ते माघार घेतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

पाच वर्षांत महाराष्ट्रातील बहुतांश प्रश्न संपले,चंद्रकांत पाटील यांचा दावा

आपली प्रतिक्रिया द्या