पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन द्या! चंद्रकांत पाटील यांची लोकप्रतिनिधींना सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chandrakant-patil

सामना प्रतिनिधी, मुंबई

भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे अशा सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर ओसरल्यानंतर पुनर्वसनाचे आक्हान आहे. ते पेलण्यासाठी भाजपकडून लोकप्रतिनिधींना आवाहन करण्यात आले आहे.

पक्षाचे सर्व खासदार, आमदार, महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन देण्याची सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली. सर्व लोकप्रतिनिधींनी ‘भारतीय जनता पार्टी, आपदा कोष’ नावाने आपले चेक किंवा ड्राफ्ट द्यावेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी किमान शंभर रुपये तर कमाल त्यांच्या इच्छेनुसार योगदान पक्षाकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा करावे, असेही ते म्हणाले.