
चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कापूस,सोयाबीन पेरले होते, मात्र पुराने पिके भुईसपाट झालीत. शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी केली मात्र पुराने त्याची पुन्हा माती केली. तरीही काही शेतकऱ्यांनी न खचता मिरचीचे उत्पादन घ्यायचे ठरवले. कापूस,सोयाबीनचं पीक हातातून गेलं, किमान मिरचीचे पिक हातात येईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र गेले दोन दिवस झालेल्या पावसाने नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आणि नदी-नाल्याचं पाणी पुराचे पाणी थेट घुसलं. यामुळे पुराने मिरचीचे पीकही गिळून टाकले.
चंद्रपूर जिल्हाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. जून,जूलै महीन्यात चारवेळा पूरपरिस्थितीचा सामना इथल्या जनतेला करावा लागला आहे. यामुळे हजारो नागरिकांना स्थलांतरीत करण्याची वेळ प्रशासनावर ओढावली. नदी,नाल्याचा काठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. मध्यतंरी पावसाने विश्रांती घेतली. यामुळे शेतकऱ्यांनी मिरचीची रोपे लावली. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाला आणि या पावसाने जिल्हाला पुन्हा झोडपून काढले. सलगच्या अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना मदतही मिळालेली नाही.


























































