
एका डॉक्टरने इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली असून मृत डॉक्टरचे नाव उमेश अग्रवाल आहे. ते नेत्ररोग तज्ज्ञ होते. शहरातील मुख्य मार्गावर अग्रवाल यांचे नेत्र तपासणीच रुग्णालय आहे, रात्री रुग्णालयातीलच रेस्टरूम मध्ये डॉ अग्रवाल यांनी हेवी डोजचे इंजेक्शन घेतले होते, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले, डॉ अग्रवाल यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, अधिक तपास शहर पोलीस करीत आहे.

























































