
चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात रात्री 11 वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला उडविल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींची नावे ऋषिकेश ढोले (17) व ओम इटनकार (18) असे आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चारचाकी वाहन चालक दारुच्या नशेत होता. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व वाहन चालक आणि इतर सहकाऱ्यांना अटक केली आहे.


























































