चंद्रपूर जिल्ह्यात पुराचा धोका वाढला, वैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोसीखुर्द धरणाचा पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 धरणाचे 2.5 मीटरने उघडले आहेत. धरणातून 1700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुढील काही तासात 2 हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्गात वाढ होणार आहे. त्यामुळे पुराचा धोका वाढला आहे.

वैनगंगा नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हाला सलग चारदा पुराचा फटका बसला आहे. या पुरामुळे महत्त्वाचे मार्ग बंद पडले आहेत. पुराने वेढा दिल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. हजारो नागरिकांचे स्थलांतर करावे लागले तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. पुराने दिलेल्या वेदना कायम असतांनाच जिल्ह्यातील काही गावांना पुन्हा पुराची भीती भेडसावत आहे.

गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे 2.5 मिटरने उघडण्यात आले आहेत. यातून 1700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सूरू आहे. काही तासांनी 2 हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. परिणामी वैनगंगा नदीला पूर येण्याची शक्यता बडावली आहे. प्रशासनाने वैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.