चंद्रपूर व गडचिरोलीतील काही तालुक्यांना भूकंपाचे सौम्य धक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी, गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी परिसरातील काही गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. घरातील वस्तू अचानक हलू लागल्याने नागरिक घराबाहेर आल्याची माहीती आहे. आतापर्यंत कोणत्याही नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान भूकंपाचा धक्कामुळे नागरिक दहशतीत आहेत.

गोंडपिपरी तालुक्यातील काही गावात रविवारला 6.48 वाजताचा सूमारास भूकंपाचे धक्के जाणवले. अनेकांनी घराबाहेर येऊन मोकळ्या जागेत आसरा घेतला. तालुक्यातील घडोली, साई नगरी येथे भूकंपाचा धक्के आनेकांनी अनुभवले. अहेरी उपविभागातील काही गावात भूकंपाचा धक्याची तीव्रता अधिक होती.

महाराष्ट्रातील अहेरी, गोंडपिपरी आणि तेलंगणा मधील बेल्लमपल्ली, आदिलाबाद आदी भाग भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. अहेरी उपविभागातील आष्टी, अहेरी, आलापल्ली, रेपनपल्ली, कमलापूर, जिमलगट्टा, गोविंदगाव, बोरी, राजाराम, गोंडपिपरी तालुक्यातील घडोली, साई नगरी येथे भूकपांचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.