
गोसेखुर्द कालव्यात रानगवा पडला.याची माहिती मिळताच विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठले.तीन तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकाने रानगव्याला सुखरूप बाहेर काढले.
नागभीड तालुक्यातील जनकापूर येथून गोसेखुर्द प्रकल्पाचा कालवा गेला आहे. या कालव्यात रानगवा पडला. कालव्याच्या पाण्यातून बाहेर निघणे रानगव्याला कठीण झाले होते. सकाळी काही नागरिकांना हा रानगाव दिसला. याची माहिती वन विभागाला देण्यात आली.वनविभागाचे अधिकारी व स्बाब संस्थेचे सदस्यांनी घटनास्थळ गाठले.रानगव्याला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली. तब्बल तीन तासांनंतर रानगव्याला दोरीच्या मदतीने कालव्यातून बाहेर काढण्यात आले.































































