
चंद्रपुरात सध्या शेता-शेतात हरभऱ्याचे पीक उभे आहे. ग्रामीण भागात हिरव्या हरभऱ्याची भाजी चवीने खाल्ली जाते. भाजी तोडण्यासाठी महिला शेत गाठतात. काही महिला या भाजीची विक्री करतात. शहरात हरभऱ्याच्या भाजीला शेवग्याच्या शेंगांचा भाव आलेला आहे.
या भाजीच्या चवीने वानरांनाही भुरळ घातली. बल्लारपूर गोंडपीपरी मार्गावरील कोठारी गावातील एका हरभराच्या शेतात वानरांची टोळी हरभऱ्याच्या भाजीवर ताव मारताना दिसली. कोठारी, काटोल- बामणी, कवड जाई येथे ग्रामपंचायतसाठी मतदान सुरू आहे.
मतदान करण्यासाठी शेतकरी घरीच थांबले आहेत. याचा फायदा वानरांनी उचलला. शेतात वानरांनी ठाण मांडलं आणि हरभऱ्याच्या भाजीचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.
पाहा व्हिडीओ –



























































