
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर ग्रामपंचायतीने कर वसुलीचा लकी ड्रॉ पॅटर्न तयार केला आहे. हे गाव जिल्ह्याच्या एका टोकावर नागपूर जिल्ह्याच्या जवळ आहे. गावात आदर्श ग्रामसचिवालाय बांधून ग्रामस्थांनी प्रशासकीय कारभाराला सुरुवात केली आहे.
मात्र गावातील विकासकामांसाठी निधी आवश्यक आहे. अशात गाळेधारकांनी कर थकविल्याने पदाधिकाऱ्यांनी लकी ड्रॉ योजना आणली आहे. कर भरा आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा, अशी ही संधी आहे. या योजनेतून सुमारे 100 गाळेधारकांना फ्रीज-टीव्ही- वॉशिंग मशीन मिळणार आहे. हा लकी ड्रॉ सरपंच आणि सदस्य स्वतःच्या निधीतून पूर्ण करणार आहेत. लकी ड्रॉ योजनेमुळे कर वसुलीला उत्साही प्रतिसाद मिळाला आहे.



























































