चंद्रपूर – महापौरांच्या नगरसेवक पतीने उपायुक्त-अतिरिक्त आयुक्तांना केली शिवीगाळ

चंद्रपूर शहर मनपाच्या आमसभेत गुरुवारी झालेल्या सत्ताधारी-विरोधकांच्या गोंधळातील दुसरे गंभीर चरण पुढे आले आहे. गोंधळानंतर महापौर कक्षात एक बैठक झाली. यात अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल आणि उपायुक्त विशाल वाघ यांच्यावर महापौर आणि सत्ताधारी नगरसेवक बरसले. आमसभेचा अजेंडा बाहेर जातोच कसा, या विषयावरून महापौरांचे नगरसेवक पती संजय कंचर्लावार आक्रमक झाले. त्यांनी उपायुक्त-अतिरिक्त आयुक्तांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.

महापौर कक्षात नगरसेवकांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडला. नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत उपायुक्त वाघ यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. उपायुक्त विशाल वाघ यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात महापौरांचे पती संजय कंचर्लावार यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय. यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या