अपक्ष आमदाराच्या पत्नीला पेन्शनची चिंता

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी सर्वात आधी पाठिंबा दिला होता. पण ते सरकार काही झालं नाही. आमच्या बाईसाहेब चिंतेत होत्या, सरकार तर झालं नाही पण आमदारांना पेन्शन मिळते असं तुम्ही सांगत होता. असे वक्तव्य चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस एका खासगी कार्यक्रमासाठी चंद्रपुरात आले होते तेव्हा त्यांच्यासमोर हे वक्तव्य करण्यात आलं. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेते मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात जोरगेवार यांनी केलेलं भाषण सध्या समाज माध्यमात वायरल होत आहे.

जिकडे कमी, तिकडे आम्ही

याच व्हिडिओत जोरगेवार यांनी खोक्यावर होणाऱ्या टिकेलाही विनोदाने उत्तर दिले. जीधर दम, उधर हम, असे काहीजण म्हणतात. मात्र आमचं तसं नाही. जिकडे कमी, तिकडे आम्ही असं आमचं आहे.