Video – चंद्रपुरात फुलला पळस, रस्त्यांवर पडला सडा

होळीचा सण आला की, चोहीकडे नजरेस पडतात ती केसरी रंगाची पळस फुलं. चंद्रपूर जिल्हा हा जंगलव्याप्त असल्यानं इथं अनेक प्रकारची जैवविविधता दिसून येते. पळस त्यापैकीच एक. पळस मोठ्या प्रमाणात इथं आढळतो. चंद्रपूर-मूल मार्गावर तर पळस अक्षरशः फुलून आला आहे. संपूर्ण रस्ताच जणू काही केसरी झाल्याचं चित्र बघायला मिळतं.

आज रंगपंचमी. पूर्वी रसायनयुक्त रंग नसायचे. तेव्हा याच फुलांचा नैसर्गिक रंग उधळला जायचा. निसर्गाला आणि शरीरालाही यामुळं कोणती हानी नसायची. पण आता लोकांकडे वेळ नाही आणि रसायनयुक्त रंग अगदी घराजवळ उपलब्ध असल्यानं पळसाच्या फुलांचा रंग तयार करण्याचं प्रमाण प्रचंड कमी झालं. मुळात पळसफुल हे केवळ रंगासाठीच नाही तर अनेक गोष्टींसाठी उपयुक्त आहे.  खोकल्यावर आणि मूत्रविकारावर ते गुणकारी आहे. छातीत कफ दाटला असल्यास पळसाची फुले उकळून त्याचा शेक छातीला दिल्यास कफ निघून जातो. त्यामुळं लोकांनी या नैसर्गिक ठेव्याचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी केल्यास बऱ्याच गोष्टी आपण साध्य करू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या