
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागात आकाशात लाल प्रकाश दिसल्याने कुतूहल वाढले. हा प्रकाश नेमका कशाचा याची समाजमाध्यमात भारीच चर्चा झाली. अनेकांनी आपल्या भागातील विडीओ समाजमाध्यमात शेअर केले. हा लाल प्रकाश पच्छिमेक़डील आकाशात दिसला. एखादी वस्तू पृथ्वीच्या दिशेने जळत येत असल्याचं दिसत होतं. हा प्रकाश नेमका कशाचा ? हा उल्का वर्षाव होता काय ? याबाबत खगोल अभ्यासक प्रा.सुरेश चोपणे यांना विचारले असता ते म्हणाले ,एखादं जूनं सॅटेलाईट पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणात खेचलं गेलं. त्यामुळे त्याचे तुकडे तुकडे झालेत आणि ते जळत खाली आले असे स्पष्ट होतय.


































































