Video – बापरे! बकऱ्य़ाची किंमत 25 लाख रुपये, कारण ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पालेबारसा  या गावातील तामदेव उंदीरवाडे यांचेकडे बकरा 25 लाखांच्या किमतीत विक्रीस उपलब्ध असल्याचे बॅनर क्षेत्रात लावण्यात आलेले आहे. ग्रामीण क्षेत्रातील असलेल्या सावली तालुक्यामधील पालेबारसा गाव आहे. या गावातील तामदेव उंदीरवाडे यांचा मालकीचा एक बकरा आहे. साडेतीन वर्ष वय असलेल्या बकऱ्याला चांगले वाढवले असून बकऱ्याचे वजन 85 किलो इतके आहे. तामदेव यांनी आपल्या बकर्‍याची किंमत 25 लाख रुपये लावले असून त्याचे बॅनर्सही लावले आहेत. लाखोरुपयांची किंमत असलेल्या बकऱ्या मधील नेमके आश्चर्य आणि वैशिष्ट काय आहे?


पालेबारसा येथील तामदेव उंदीरवाडे यांना फोन द्वारे माहिती विचारणा केली असता बकऱ्याच्या कपाळावर चंद्र असल्याची माहिती त्यांनी दिली. बकरी ईद निमित्त कपाळावर चांद असलेल्या बकऱ्याला महत्त्व प्राप्त होत असते. बकऱ्य़ाच्या कपाळावर चंद्र असणे ही दुर्मीळ बाब असून शुभ समजले जाते.

नागरिकांनी आतापर्यंत गाडी, कार, घर, आलिशान फ्लॅट, बंगले, प्लॉट , शेती,  महागडे लाखांचे किमतीत असलेले बघितले परंतु बकरा 25 लाखांचे किमतीचा विक्रीस असल्याने आश्चर्य वाटत आहे. 25 लाखांचा किमतीत बकरा विक्रीस उपलब्ध असल्याने नागरिकांनी बॅनर पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.