चंद्रपुरातील गरब्यात पहिल्याच दिवशी शिवसेना शिवसेना गाण्यावर धूम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभिषेक भटपल्लीवार

नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून देशभर गरब्याची धूम आहे. गरब्यामध्ये पारंपरिक गुजराती गाण्यांबरोबर महाराष्ट्रीयन, बॉलिवूड गाण्यांवर गरब्याचा ताल धरत तरुण, ज्येष्ठ, लहानमुलेही थिरकताना दिसतात. चंद्रपुर शहरातील रामनगर परिसरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे यांच्या नेतृत्वात जय भवानी गरबा मागील 25 वर्षापासून सुरू आहे.

या गरब्यामध्ये सर्व जाती धर्मांच्या लोकांचा सहभाग असतो. शेकडो स्पर्धकांनी जय भवानी गरब्यामध्ये सहभाग घेतला आहे. गरब्याच्या पहिल्यादिवशीच जात धर्म गोत्र आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना…. . या गाण्यावर स्पर्धकांनी ताल धरत नृत्य करत प्रेक्षकांच लक्ष वेधलं. जय भवानी गरब्यामध्ये प्रेक्षक अलोट गर्दी करीत आहेत. या गरब्याचे संचालन शिक्षकसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश नायडू हे करत आहेत. दुर्गा देवीची आरती करून गरब्याला सुरवात करण्यात आली, यावेळी अनेक स्पर्धक व प्रेक्षक उपस्थित होते.