चंद्रपुरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा आक्रमक मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात वैविध्यपूर्ण आंदोलन केलं. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढत इंधन दरवाढीवर प्रहार करणारे देखावे यावेळी सादर केले गेले.

पेट्रोलचे दर शंभरी पार करू लागले, तर स्वयंपाकाचा गॅसही महागला. त्यामुळे सर्वसामान्यांचे कसे जगणे कठीण झाले, हे या आंदोलकांनी सचित्र लोकांपुढे मांडलं. या रॅलीत सहभागी महिलांनी रस्त्यावर चुली मांडून स्वयंपाक करीत गॅस दरवाढीचा प्रश्न मांडला, तर युवकांनी दुचाकींना धक्का देत पेट्रोल दरवाढीचा निषेध केला.

पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रांचे फलक झळकवत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. तिथे मागणीचे निवेदन देण्यात आले. सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर हे आंदोलन असल्याने शहरवासीयांनी यात मोठा सहभाग नोंदवला.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे , शहर प्रमुख प्रमोद पाटील, युवासेना समनव्य विक्रांत सहारे, गणेश ठाकूर, सूचित पिंपलशेंडे, स्वप्नील काशीकर, वशीम शेख, मनस्वी गिर्हे, कुसुम ताई उद्गार सह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.

पाहा व्हिडीओ-