चंद्रपूर – वीजप्रवाहाचा संपर्कात आल्याने बाप, लेकीचा मृत्यू; राजूरा तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर येथे शेताला लागुन असलेल्या नाल्यातील पाणी आणण्यासाठी गेलेल्या बाप, लेकीचा विजप्रवाहाने घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दूदैवी घटना राजूरा तालुक्यात आज घडली. स्वप्नील सत्यपाल चहारे (वय 32), मुलगी शेजीक स्वप्नील चहारे (वय 6) अशी मृत्युमुखी नावं आहेत.

या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राजूरा तालूक्यात येणाऱ्या सिंधी येथिल शेतकरी स्वप्नील चहारे हे आपल्या सहा वर्षिय मुलीला सोबत घेऊन शेतात गेले. शेतालगत नाला आहे. या नाल्यावर शेतातील सिंचनासाठी मोटारपंप बसविला होता. नाल्यातील पाणी आणण्यासाठी स्वप्नील चहारे गेले. यावेळी सोबत मुलगी होती. मुलीने नाल्यातील पाण्यात पाय ठेवताच तिला वीजप्रवाहाचा झटका बसला. तिला वाचविण्यासाठी वडिलांनी धाव घेतली. यात दोघांचाही वीजप्रवाहाने मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान पोलीस आणि महावितरणचे अधिकार्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास विरूर पोलीस करत आहेत.