
चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थ ठार झाला आगेय मुधोली गावाशेजारी मोहर्ली वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. 138 मधील ही घटना असून भारत रामाजी बावणे (65) असे मृताचे नाव आहे.
जंगलात सरपण आणण्यासाठी तो गेला होता. माहिती मिळताच वनपथक घटनास्थळी पोचले असून शव पोस्टमोर्टमसाठी रवाना करण्यात आले. कोअर झोनमध्ये हा इसम कसा आणि कशासाठी गेला होता, याची चौकशी केली जात आहे.

























































