रिकाम्या खुर्च्यांचा रेकॉर्ड कायम! विसापूरच्या सभेत मिंधेंचं भाषण सुरू होताच लोकं गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिकाम्या खुर्च्यांसमोर सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे भाषण आता नेहमीचेच झाले आहे. आज ही हा रेकॉर्ड कायम राहिला. चंद्रपूरच्या विसापूर मध्ये तेच चित्र आज पुन्हा पाहायला मिळालं. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पांच्या लोकार्पण व भूमीपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विसापूर येथे आले होते. यावेळी नेहमी प्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या भाषणाच्या वेळी जमलेल्या लोकांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. त्य़ामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करावं लागलं.

विसापूर येथील श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनचा लोकार्पण सोहळा व श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ व महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल याचा भूमीपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी 11 मार्च रोजी चंद्रपूरातील विसापूर येथे आले होते. यावेळी आलेल्या लोकांसाठी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. मात्र एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच लोक तिथून जाऊ लागले. शिंदेच्या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.