चंद्रपूर – अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी महिला गंभीर जखमी

शेतात काम करत असताना अस्वलाने शेतकरी महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची गंभीर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील वाघेडा गावामधील शेतशिवारात घडली.

चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर वाघेडा गावा आहे. तुळसाबाई शामराव चौधरी असे जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. शेतीचा हंगाम सुरू झाल्याने आपल्या शेतशिवारात काम करीत असतांना अचानकपणे अस्वलाने हल्ला करून महिलेला जखमी केलं.

महिलेने आरडाओरडा केल्याने शेतकऱ्यांच्या मदतीने अस्वलापासून महिलेची सुटका करून जखमी महिलेला चिमूर येथील उपसामान्य रुग्णालयात आणण्यात आले. परिसरात अस्वलाच्या वावराने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या