Chandrayaan-2 मोदींचा अपशकुनी पाय ‘इस्रो’ला भोवला, कुमारस्वामींचे वादग्रस्त विधान

3366

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. हिंदुस्थानच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असणाऱ्या ‘चांद्रयान-2’चे विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असताना पंतप्रधान मोदी बंगळुरूच्या इस्रो कार्यालयात हजर होते. हा मोठा अपशकून होता, असे विधान कुमारस्वामी यांनी केले आहे.

Chandrayaan-2 – किलोमीटरचा मीटर झाला? ‘विक्रम’च्या संपर्काबाबत नव्या चर्चेला उधाण

20 सप्टेंबर रोजी विक्रम लँडरशी संपर्क होणार, मोठी भविष्यवाणी

सात सप्टेंबरला विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटरवर असताना विक्रमचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. संपर्क तुटण्याच्या टप्यापर्यंत लँडरमधील सर्व सिस्टम, सेन्सर्स अत्यंत अचूकतेने काम करत होत्या. याचा उल्लेख करताना कुमारस्वामी म्हणाले की, पंतप्रधान मोदी बंगळुरूला जसे काय मीच चांद्रयान-2 चंद्रायवर लॅण्ड करणार आहे असा संदेश देण्यासाठी आले होते. या यानासाठी संशोधकांनी तब्बल 10 ते 12 वर्ष कठोर मेहनत केली. परंतु मोदी फक्त प्रचाराच्या दृष्टीने आले होते. त्यांनी इस्रोमध्ये पाय ठेवला आणि तो क्षण संशोधकांसाठी दुर्भाग्याचा ठरला, असेही ते म्हणाले.

नासाचा प्रयत्न
चंद्राच्या पृष्ठभागावर कलंडलेल्या अवस्थेत पडलेल्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा इस्रो अथक प्रयत्न करत आहे. पण अजूनही त्यास हवे तसे यश मिळत नसल्याने नासा विक्रमशी संपर्क करण्यासाठी पुढे सरसावली आहे. नासाने नुकताच विक्रम लँडरला ‘हॅलो’ असा मेसेज पाठवला आहे. नासा विक्रमच्या डीप स्पेस नेटवर्क -डीएसएनच्या द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. यास इस्रोने सहमती दिली असून विक्रमशी लवकरात लवकर संपर्क करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 20-21 सप्टेंबरला जेव्हा चंद्रावर रात्र असणार आहे. त्याआधी विक्रमशी संपर्क झाला नाही तर चांद्रयान-2 मिशन पूर्णतः यश मिळाले नाही हे स्पष्ट होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या