चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

61

सामना ऑनलाइन | नवी दिल्ली

हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) ची  मून मिशन , चांद्रयान 2 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. सोमवारी  दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी सगळ्यात ताकदवान बाहुबली रॉकेट GSLV-MK3  द्वारे चांद्रयान 2 अवकाशात झेपावले आहे. या प्रक्षेपणामुळे इस्रोने नवा इतिहास रचला आहे. या अभूतपूर्व यशानंतर सर्व स्तरातून इस्रोचे कौतुक केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान -2 चे लाईव्ह प्रक्षेपण पाहुन इस्रोचे कौतुक केले आहे. तसेच इस्रोच्या वैज्ञानिकांशी संपर्क साधत पंतप्रधानांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

‘चांद्रयान -2 हे चंद्राच्या अशा भागावर उतरणार आहे जेथे या आधी कोणीही पोहचु शकले नाही. यामुळे चंद्राची नवीन माहीती आपल्याला मिळणार आहे’. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. चांद्रयान- 2च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर बॉलीवुड स्टार अक्षय कुमार, विवेक ओबेरॉय सह अन्य कलाकारांनीदेखील वैज्ञानिकांना शुभेच्छा देल्या आहेत.

अक्षय कुमारने ‘अथक प्रयत्नांनी यश प्राप्त करणाऱ्या टीमला सलाम आहे’ असे ट्विट केले आहे.तसेच दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीही इस्रोच्या टीमला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयाल तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील इस्रोचे कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या