
मोबाईल फोन हा प्रत्येकाच्याच जीवनाचा आविभाज्य भाग बनला आहे. हल्ली बहुतांश कामांकरिता मोबाईल वापरणे सोयीचे होऊ लागले आहे, मात्र यामुळे अनेक वेळा नुकसान होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावल्यास व्यक्तिचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे सावध राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही मोबाईल फोन चार्जिंगला लावला असेल सावध राहण्याची आवश्यकता आहे. बऱ्याचदा रेल्वे स्थानक, एअर पोर्ट किंवा इतर सार्वजनिक स्थळी उपलब्ध असलेल्या सॉकेटमध्ये चार्जर लावून मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी ठेवला जातो. अशा वेळी तुमची वैयक्तिक माहिती हॅक होण्याची शक्यता असते.
अशा घटनांबाबत ओडिशा पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग स्टेशन, यूएसबी पॉवर स्टेशन आणि इतर ठिकाणी मोबाईल चार्ज करू नका असे सांगण्यात आले आहे. ओरिसाने ट्विट केले आहे की, सायबर घोटाळेबाज तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करून तुमची वैयक्तिक माहिती मोबाईलवरून चोरू शकतात, असा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगबाबत इशारा देण्यात आला आहे.
Fraudsters try to access your #SIMCard or duplicate it because all your accounts are linked to your registered number. They often call you pretending to be Mobile operator staff and try to convince you with SIM upgrades or benefits.
So be aware & stay cyber_safe.#cybersecurity pic.twitter.com/LYRw1IfWbx— Odisha Police (@odisha_police) September 4, 2022
अलीकडेच हैदराबादच्या सायबर पोलिसांनीही इशारा दिला आहे. 5G सिम अपग्रेड करण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात असल्याच्या घटना सायबर सेलकडून घडल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये स्कॅमर सिम ब्लॉक करतात आणि खात्यातून पैसे काढतात. यासाठी स्कॅमर्सकडून मोबाईल यूझरला लिंक पाठवली जाते. वापरकर्ते या लिंकवर क्लिक करताच, त्यांच्या बँक खात्याशी संबंधित अनेक तपशील स्कॅमरपर्यंत पोहोचतात. त्यानंतर लोकांची फसवणूक करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही अज्ञात लिंक्सबाबत सावधगिरी बाळगावी, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.




























































