
सामना ऑनलाईन । मुंबई
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची तब्येत बिघडली असून त्यांना मुंबईत इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. 20 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमध्ये दुसर्या टप्प्यातील मतदानानंतर सोमवारी अजित जोगी मुंबईत आले. प्रचारादरम्यान जोगी यांची तब्येत बिघडली.
जोगी यांना श्वास घेण्यात अडचण येत होती. त्यांची तब्येत सुधरत असून 5 ते 6 डिसेंबर दरम्यान ते रायपूरला परतू शकतात अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.



























































