
सामना ऑनलाईन। बैकुंठपूर
मानवी शरीर म्हणजे चालतं फिरतं मशीन आणि अन्न हे त्याच इंधन. पण या जगात असेही काही लोकं आहेत ज्यांचे शरीर हे दुसऱ्यापेक्षा वेगळे आहे. ज्यांची शरीररचना सामान्य असली तरी त्यांची आंतरिक शरीररचना ही वेगळीच आहे. अशीच एक महिला छत्तीसगड येथे राहत असून ती तेहतीस वर्षांपासून अन्न न खाता फक्त चहावर जगत आहे. या महिलेची आंतरिक शरीर रचना बघून डॉक्टरही हैराण झाले आहेत. पल्ली देवी असे तिचे नाव आहे.
कोरिया जिल्हयातील बैकुंठपूर मधील विकासखंड येथे बरदिया गावात ती राहते. पल्ली देवी 11 वर्षांची असताना तिने अचानक खाणे पिणे सोडून दिले होते. ती फक्त चहा प्यायची. त्यावरच ती दिवसभर राहायची व रात्री झोपतानाही एक कप चहा पिऊन झोपायची. तेव्हापासून तिने अन्नत्यागच केला. तिला जेवण सोडून 33 वर्ष झाली आहेत. पण अन्न न खाल्ल्यामुळे तिच्या शरीरावर काहीही परिणाम झालेला नाही. उलट काहीही न खाता तिचे हिमोग्लोबीन 8 ते 9 एवढे आहे. आज ती 44 वर्षांची असून ती शिवभक्तही आहे. देवावर आपली श्रद्धा आहे. त्यानेच ही शक्ती दिल्याचे तिचे म्हणणे आहे. पण डॉक्टरांसाठी मात्र हे मात्र मोठे आवाहन आहे. कारण वैद्यकिय शास्त्रानुसार अन्न न खाता कुठलीही व्यक्ती इतके दिवस जिवंत राहणे अशक्य आहे.



























































