शेफ विष्णू मनोहर यांच्या मते गाजराचा ज्यूस हा हिवाळ्यासोबत उन्हाळ्यातील पिणे खूप गरजेचे आहे. गाजराचा ज्यूस पिण्याचे फायदे सर्वात आधी आपण जाणून घेऊया. त्यानंतर पाहुया गाजराच्या ज्यूसची विष्णू मनोहर यांची रेसिपी.
गाजराचा ज्यूस पिण्याचे फायदे
गाजराच्या रसात पोटॅशियमची मात्रा खूप असते. पोटॅशियम आपल्या हद्यासाठी खूप उत्तम मानले जाते. यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. तसेच हृदयविकाराचा धोकाही खूप कमी होतो.
वजन कमी करणाऱ्यांसाठी गाजराचा ज्यूस हा खूप महत्त्वाचा मानला जातो. गाजराच्या रसात कॅलरीज कमी असतात. यामुळेच वजन कमी करण्यास मदत होते.
गाजराचा रस शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो, ज्यामुळे यकृत निरोगी राहते.
गाजराच्या रसात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक आहेत.
गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. तसेच गाजराचा ज्यूस पिण्यामुळे त्वचेवरील डाग कमी होतात. तसेच त्वचेला चमकही येते.
गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप आवश्यक मानले जाते. यामुळे दृष्टी सुधारण्यास खूप मदत होते.
गाजराचे ज्यूस
साहित्य – गाजर 200 ग्रॅम, आवळा 1 नग, आलं 1 इंच (तुकडा), जेष्ठमध पावडर अर्धा चमचा, मीठ चवीनुसार.
कृती – गाजर स्वच्छ धुऊन, सोलून त्यामधे आवळा, आलं, जेष्ठमध पावडर घालून मिक्सरमध्ये बारीक करा. सर्व करतेवेळी चाळणीने न गाळता तसेच सर्व्ह करावे. त्यामुळे फायबर सुद्धा पोटात जातात. वाटल्यास चवीनुसार मीठ व साखर घालावी.