कोपरगाव येथे रसायनमिश्रित गावठी दारू जप्त; पोलिसांनी केली दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव शहर पोलिसांच्या पथकाने तालुक्यात विविध ठिकाणी कारवाई करून 40 हजारांची गावठी दारू आणि इतर साहित्य जप्त केले. याप्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक पोलिसांनी जेऊर पाटोदा शिवार व कोकमठाण शिवार बलसाड वस्तीभागातून केमिकल मिश्रित गावठी दारू पकडली.

तालुक्यातील गोदावरी नदी पात्राच्या कडेला काटवनात, जेऊर पाटोदा व कोकमठाण शिवार बलसाड वस्ती, येथील गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यांनी बुधवारी 9 ते 11 कारवाई केली. त्यात हस्तगत केलेले 40 हजारांचे रसायन जागेवर नष्ट करण्यात आले. सपोनी भरत दाते, पोहेकॉ के एस जाधव, संभाजी शिंदे, राम खारतोडे , गणेश काकडे, पोना शेवाळे यांनी कारवाई केली.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांत अशोक उत्तम बोर्डे (24, रा.मुर्शतपुर ,ता. कोपरगाव) व कपिल अभिमान माळी (35, रा.बलसाड वस्ती कोकमठाण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासी अधिकारी पोहेकॉ जाधव पोना शेवाळे करीत आहेत.