नारळाच्या करवंटीत प्या चहा, पर्यावरण संवर्धनासाठी विक्रेत्याची अनोखी संकल्पना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या व्यवसायात काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी नवनवीन शक्कल लढवल्या जातात. अशीच एक हटके संकल्पना चेन्नईतील चहा विक्रेता राबवत आहे. दिनकरन असे या चहा विक्रेत्याचे नाव आहे. मरिना बीचवर त्याचा चहाचा स्टॉल आहे. तिथे नारळाच्या करवंटीमध्ये चहा द्यायला त्याने सुरुवात केली आहे. दिनकरन सांगतात, मला काहीतरी वेगळं करायचं होतं. काचेचा कप किंवा कागदी कप यांच्यापेक्षा करवंटीचे कप ऑर्गेनिक आहेत.