गोरगरीब, मजूर वर्गाला शिवभोजन थाळीचा मोठा आधार;टीका करणाऱयांनो जरा वस्तुस्थिती पहा – छगन भुजबळ

chhagan-bhujbal

कोरोना निर्बंधांच्या काळात मजूर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीब असणाऱया अनेकांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत असल्याचे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. काल पहिल्याच दिवशी तब्बल 96 हजार 352 शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले, तर आज दुपारपर्यंत 98 हजार 985 थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे.

शिवभोजन थाळी ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मागील वर्षीदेखील या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. या वर्षीदेखील या योजनेतून गरीबांना थाळीचे मोफत वितरण केले जात आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांत शिवभोजन थाळीबाबत टीका करताना वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि नंतर व्यक्त व्हावे असे खडे बोल भुजबळ यांनी सुनावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या