
छत्तीसगड विधानसभेत शेतकऱयांना खतांचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. या गदारोळातच कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न सरकारने केल्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले. गदारोळ आणखी वाढल्यामुळे काँग्रेसच्या 35 पैकी 30 आमदारांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले. प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसचे आमदार उमेश पटेल यांनी राज्यात डायामोनियम फॉस्फेट या खताचा पुरेसा पुरवठा करण्यात सरकार असफल ठरल्याप्रकरणी प्रश्न विचारला. एकूण मागणीच्या 50 टक्केही पुरवठा सरकारला करता आला नाही, असे ते म्हणाले.