छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील वाहतूककोंडीचा प्रश्न अखेर सुटला, शिस्तबद्ध पार्किंग नियोजनामुळे दिलासा

दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न अखेर सुटला आहे. या परिसरातील वाहनांच्या पार्किंगसाठी वाहतूक विभागाकडून नियोजन करण्यात आले असून फलक लावण्यात आले आहेत. या शिस्तबद्ध पार्किंग नियोजनामुळे वाहनचालकांसह रहिवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात पहिल्यांदाच ‘पार्किंग करा, पण नियोजित वेळेत’, अशी सूचना देणारे फलक लावण्यात आले असून त्यावर पार्किंगचा वेळ दर्शवण्यात आला आहे. दादर वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त वाहतूक अनिल कुंभारे, अप्पर पोलीस आयुक्त प्रियांका नारनवरे, पोलीस आयुक्त दीपाली घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दादर वाहतूक विभागाचे निरीक्षक कन्हैयालाल शिंदे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज पार्कबाहेरील रस्त्यावर पार्किंग फलक लावण्यात आले आहेत.

अशी व्यवस्था, नियम मोडल्यास दंड

– सकाळी 5.30 ते 11.30 मैदानालगत वाहने उभी करण्यास परवानगी दिली आहे. तसेच या ठिकाणी कुणी कायमस्वरूपी पार्किंग करू नये म्हणून रात्री 11.30 ते सकाळी 5.30 वाजेपर्यंत रहिवासी बाजूला

पार्किंग देण्यात आले आहे.

– या ठिकाणी कायमस्वरूपी पार्किंग करता येणार नाही. या फलकावर पार्किंग कालावधी आणि नियम मोडल्यास होणाऱया दंडाची रक्कमही दर्शवली आहे. यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी 500 रुपये दंड, दुसऱया गुन्ह्यासाठी 1500 रुपये दंड होईल.

छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात आता नियोजनबद्ध पार्ंकग केले जात असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न मिटणार असून रहिवाशांनाही दिलासा मिळणार आहे. – कन्हैयालाल शिंदे, प्रभारी पोलीस निरीक्षक