महापराक्रमी सरदार गोदाजी जगताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोदाजी जगताप हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज या तिन्ही छत्रपतींचा कार्यकाळ अनुभवलेले सरदार होते. ते सासवड परगण्याचे देशमुख, स्वराज्यासाठी झालेली खळद बेलसर लढाईचे ते सरदार होते. तसेच शेवटच्या काळात 35000 पायदळाची सरनौबतकी त्यांच्याकडे होती. 10 नोव्हेंबर 1659 ची प्रतापगडाची लढाई हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक क्षण मानला जातो. या लढाईत गोदाजी जगताप यांनी खानाचे असंख्य सैन्य कापून काढले. छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य वाचवण्याचे महत्त्वाचे कार्य गोदाजी जगताप यांनी केले. यानंतर मात्र गोदाजी जगताप यांचा इतिहासात उल्लेख सापडत नाही. त्यांचा मृत्यू कधी झाला याचीदेखील नोंद इतिहासात सापडत नाही. अशा या वीर सरदाराची समाधी सासवड येथे संगमेश्वर मंदिराजवळ आहे. सासवड शहरातील संगमेश्वर मंदिराच्या उत्तरेस पूर्वाभिमुख ही घुमटी आहे. ही सरदार गोदाजी जगताप यांची समाधी. समाधीची अवस्था फार बिकट असून बरेचसे बांधकाम काळाच्या ओघात कोसळले आहे.