
छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत नक्षलवादी कमांडर मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण उर्फ भास्कर ठार झाला आहे. मोडेमचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जाते.
मोडेमवर एक कोटी रुपयांचे इनाम घोषित करण्यात आले होते. मोडेमवर हत्या, लूट आणि पोलिसांवरील हल्ले यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच अनेक नक्षली मोहिमांचा मोडेम मास्टरमाईंड होता. मैनपूरमधील भालाडिगी माटलच्या घनदाट जंगलात सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम सुरू आहे. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी बुधवारी या परिसरात नक्षलविरोधी मोहीम सुरू केली.