फेअरवेल पार्टी करणं पडलं महागात, मुख्याध्यापकांनी अकरावी-बारावीच्या 104 विद्यार्थ्यांचे केले निलंबन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगडमधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विनापरवानगी फेअरवेल पार्टी करणं चांगलेच महागात पडले आहे. कॉलेजच्या प्राचार्यांनी या घटनेची गांभिर्याने दखल घेते अकरावी – बारावीच्या 104 विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. अशाप्रकारची कारवाई करुन मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या बेशिस्तपणावर लगाम घातला आहे.

छत्तीसगडमधील बलौदाबाजारच्या भाटापारस्थित स्वामी आत्मानंद इंग्लिश मीडियम शाळेतील ही घटना आहे. विनापरवानगी विद्यार्थ्यांनी महाविद्यालाच्या बाहेर फेअरवेल पार्टी केल्याने प्राचार्यांनी ही कारवाई केली आहे. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक केशव देवांगन यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांनी हा बेशिस्तपणा केला असून त्यांना 14 जानेवारीपर्यंत निलंबित केले आहे.

अशाप्रकारची कारवाई करुन एकत्र विद्यार्थ्यांचे निलंबन करण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. ही शनिवारची घटना आहे. त्यादिवशी शाळेत अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी महाविद्यालयाची वेळ होऊनही वर्गात आले नव्हते. जेव्हा नेमकी एवढी मुलं का आली नाहीत याचा शोध घेतला असता कळंल की शिक्षकांना न कळवता शाळेच्या बाहेर कोणााला काही माहिती न देता बाहेर हॉटेलमध्ये फेअरवेल पार्टीचे आयोजन केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बंक मारले होते.

यावर मुख्याध्यापक केशव देवांगन यांनी विद्यार्थ्यांच्या या बेशिस्तपणाबाबत त्यांना धडा शिकविण्यासाठी 14 जानेवारी पर्यंत निलंबन केले आहे. ही कारवाई मुलांचा बेशिस्तपणा आणि मुलांच्या सुरक्षेबाबत केली आहे. याबाबत मुलांच्या पालकांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर निलंबन रद्द करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.