छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन, बॅनर झळकल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुख्यात गुंड छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या स्पर्धेचे बॅनर झळकले असून, त्यावर छोटा राजनचा फोटोही आहे. सीआर सामाजिक संघटना महाराष्ट्रने हे बॅनर लावले आहेत. हा प्रकार मालाड येथे घडल्याचं उघड झालं आहे.

मालाडच्या तानाजी नगर येथे गणेश मैदान, कुरार व्हिलेज येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आहे. या बॅनरचे फोटो व्हायरल झाला आहे. ही स्पर्धा शनिवारी आणि रविवारी होणार आहे.

छोटा राजन याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याचा प्रकार 2020मध्येही घडला होता. ठाण्यात दोन ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरमुळे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.