
राजधानी दिल्लीत बर्ड फ्लूच्या संकटामुळे घालण्यात आलेली बंदी मागे घेण्यात आली आहे. तेथील गाझीपूर कोंबडी बाजारातून घेण्यात आलेले नमुने निगेटिव्ह आढळल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवार यांनी हा निर्णय घेतला. कोंबडय़ांच्या आयातीवरील बंदीही हटवण्यात आली आहे.
दिल्लीतील गाझीपूर कोंबडी बाजार हा आशियातील सर्वात मोठा कोंबडी बाजार आहे. दिल्लीत कावळे आणि बदके अचानक मरून पडल्यानंतर त्यांची चाचणी केली गेली. त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळले होते. त्यानंतर गाझीपूर बाजारातूनही कोंबडय़ांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले गेले होते. सावधगिरी म्हणून सरकारने बाजार दहा दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.



























































